शिवसेना (उबाठा) ने तोडफोड करण्याचा इशारा देताच मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात

चाळीस हजार रुपयांसाठी सहा तास मृतदेह अडकवून ठेवला, हकिमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील प्रकार

NEWS PUBLIBLISHED BY NEWS24TAS

मलकापूर :- शहरातील भारत कला रोडवरील हकिमी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलावे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ऑपरेशन होऊन मरण पावलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना चाळीस हजार रुपयांची मागणी करत मृतदेह तब्बल सहा तास अडवून ठेवाल्याचा प्रकार ९ एप्रिल रोजी उघडकीस आला होता. या बाबाबतची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी शिवसेना उबाठा शहरप्रमुख गजानन ठोसर, नगराध्यक्ष अॅड . हरीश राबळ यांना देताच  त्यांनी हॉस्पिटल मध्ये येत मृतदेह पैश्यांसाठी अडवून ठेवल्याचा जाब विचारत हॉस्पिटल तोडफोड करण्याचा इशारा देताच रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताबडतोब नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला.

मलकापूर तालुक्यातील ग्राम शिरढोण येथील कमलबाई यादव इंगळे (वय ६८) का घरात पाय घसरून पडल्याने त्यांचा डावा  हात व पाय ५ एप्रिल रोजी फ्रैक्चर होऊन त्या  झाल्या जखमी होत्या, त्यांना मलकापूर येथील हकिमी माटी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून ७ एप्रिल रोजी रात्री आठ ते दहा  दरम्यान त्यांचावर शस्त्रक्रिया  करण्यात आली. हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असतांना ९ एप्रिल रोजी सकाळी बार वाजे  दरम्यान हृदयविकाराच्या  तीव्र झटक्याने त्यांचे हॉस्पिटल मध्येच निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला, विनवणी करूनही मृतदेह ताब्यात देत नसल्याने रुग्णाच्या  नातेवाईकांनी सदारील  घटनेची माहिती शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर,  अॅड. हरीश राबळ यांना दिली, माहिती मिळताच  मदतीला धावून येत हॉस्पिटलमध्ये तात्काळ धाव घेत मृतदेह अडवून ठेवण्याचा जाब शिवसेना शहर अध्यक्ष गजानन ठोसर आणि अँड. हरीश रावळ यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला विचारत हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा इशारा दिला. यावेळी घाबरून हकिमी हॉस्पिटल प्रशासन नमले. अॅड होश रावळ, नजान्न ठोसर यांनी मृतदेह मुलगा योगेश यादव इंगळे, गणेश इंगळे, अनंत नारखेडे, सचिन नारखेडे, प्रदीप बराडे व नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.

नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी घेतल्या नदी पात्रात उड्या!

जालन्यात धक्कादायक प्रकार उघडकीस! माणुसकीला काळिंबा फासणारी घटना उघडकी

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या