३१ डिसेंबर २००१ म्हणजे आजपासून तब्बल २३ वर्षा अगोदर हर्षद मेहता यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता.
बिगबुल मार्केट का बच्चन अश्या अनेक नावाने त्या काळात ओळखले जाणारे हर्षद मेहता ते ज्या शेअरवर हात ठेवतील त्याचे सोने होत. अशी त्यांची सुरवातीची ओळख ते भारतील सर्वात मोठा घोटाळा करणारे मेहता इथपर्यंत छा त्यांचा शेवट अनेकानं साठी ते आज देखील हिरो तर काहींना आजही ते फक्त एक घोटाळेबाज वाटतात.
हर्षद मेहता यांचा थोडक्यात जीवनप्रवास.
आज त्यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे आज २३ वर्षा अगोदर हर्षद मेहता यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म २९ जुलै १९५४ ला पनेल मोटी (राजकोट गुजरात) च्या एका छोट्या व्यापारी घरात झाला होता. त्यांचे बालपण मुंबईतील कांदिवली येथे गेले.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने स्तलांतर करत रायपुर च्या मौदहापारा गुरूनानक चौक येथे स्थायी झाले होते त्यांचे शिक्षणही तेथेच झाले.त्याचे शालेय शिक्षण होली क्रॉस बॅरन बाजार माध्यमिक विद्यालयातून झाले. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर हर्षद मेहता यांनी मुंबईच्या लजपत राय कॉलेजमधून बी.कॉम चे शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढची आठ वर्षे छोट्या नोकऱ्या केल्या. बी.कॉम. उत्तीर्ण झाल्यानंतर हर्षदने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सेल्स पर्सन म्हणून पहिली नोकरी केली आणि त्याचवेळी शेअर मार्केटमध्ये त्याची आवड निर्माण झाली आणि ते नोकरी सोडून हरिजीवनदास नेमिदास सिक्युरिटीज नावाच्या ब्रोकरेज फर्ममध्ये नोकरीला लागले आणि आनंदाने परिजीवनदासांना गुरू म्हणून स्वीकारले.
प्रसन्न परजीवनदास यांच्यासोबत काम करताना, हर्षद मेहता यांनी शेअर बाजारातील प्रत्येक युक्ती शिकून घेतली आणि 1984 मध्ये ग्रो मोअर रिसोर्सेस आणि ॲसेट मॅनेजमेंट नावाची स्वतःची कंपनी सुरू केली आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ब्रोकर म्हणून सदस्यत्व घेतले. आणि इथून पुढे शेअर बाजारात हर्षद मेहता यांचा प्रवास सुरू झाला जो की देशाच्या आर्थिक इतिहासात कायम स्वरुपी लक्षात ठेवला गेला नंतरच्या काळात हर्षद मेहता यांनी शेअर बाजारातून खूप पैसा त्यानंतर त्यांच्यावर अनेक बँकांच्या पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी त्यांना अटक झाली व ३१ डिसेंबर २००१ साली त्यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
