मुंबई पोलिसांकडून ‘तसली’ गाणी वाजवण्यावरही बंदी.
मुंबई:- भारतातील सर्वात लोकप्रिय सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या १३ मार्च रोजी होळी व १४ मार्च रोजी धुळीवंधन संपूर्ण देशात साजरे केले जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून होळी व धुलीवंदन सण साजरा करते वेळी इतराना त्रास होऊ नये म्हणून १२ मार्च ते १८ मार्च पर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांनी नेमकी कोणती नियमावली जाहीर केली?
मुंबई पोलिसांनी होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर केली असून यात बीभत्स गाण्यांवर बंदी असून आक्षेपार्ह घोषणांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्यांनो सावध व्हा. त्याचबरोबर फुगे फेकण्यावरही बंदी असून उत्सवादरम्यान पाण्याने भरलेले फुगे अथवा पिशव्या कोणी फेकल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.पोलिसांनी जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणाऱ्यावर महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.त्यामुळे मुंबईकरांनो होळी सण साजरा करतांना कायद्यात राहून साजरी करा अन्यथा पोलिसी कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.
अर्जुन खोतकर यांच्या पाठपुवठ्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.
