6मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची देखील उपस्थिती!
News published by News24tas
कल्याण:– महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष व दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांचे अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक राहिलेले पक्ष परंतु प्रत्येक निवडणुकीत या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी सर्वच कार्यकर्त्याची इच्छा असते परंतु कित्येक वर्षांच्या प्रयत्नांनी देखील हे दोन्ही पक्ष काही केल्या एकत्र आलेच नाहीत. यावेळी मात्र खुद्द राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात सूचक वक्तव्य करत संभाव्य युतीला दुजोरा दिला व यावेळी तरी दोही ठाकरे बंधू एकत्र येती असे सध्याचे चित्र असून याची सुरवात देखील होत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी मनसे माजी आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता अनेक राजकीय चर्चांना या उपस्थितीमुळे उधाण आले आहे.
पलावा पुलाच्या निमित्ताने मनसे – शिवसेना पक्ष एकत्र!
डोंबिवली येथील पलावा पुलाचे चालू असलेले संथ गतीचे काम व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास या विरोधात दोन्ही पक्ष चागलेच आक्रमक झाले असून या पुलाचे उद्घाटन ३१ एप्रिलला सुरू होईल असे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते मात्र तरी देखील हा पूल पूर्ण न झाल्याने दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत.मनसेने तर या विरोधात बॅनर बाजी करत सर्वात संथ गतीने काम म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे अशी मिश्किल टीकाही बॅनर च्या माध्यमातून केली आहे.त्यामुळे दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले नसले तरी नागरिकांच्या प्रश्नावरून दोन्ही पक्ष व कार्यकर्ते तसेच नेते मात्र या निमित्ताने एकत्र आल्याचे पहिला मिळाले.
अंबानी गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय?
