बीडच्या राखेचे सिंडीकेट आणि येथील पुष्पा म्हणजेच वाल्मीक अण्णा.
news published by new24tas
बीड:-पुष्पा चित्रपटातील सिंडीकेट आणि लाल चंदनाची तस्करी करणारा पुष्पा तर तुम्ही सगळ्यांनी पहिलाच असेल त्याची संपूर्ण काहीनी तर तुम्हाला माहितीच असेल परंतु असाच काहीसा मिळत जुळत किस्सा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील बीड मधला फक्त येथे जागेवर चंदणाच्या जागी तस्करी होते ती राखेची आणी पुष्पा एवजी इथे सिंडीकेट चालवतो अण्णा म्हणजेच वाल्मीक कराड असेच काहीसे म्हणावे लागेल.
१९७१ साली बीड येथे अणुऊर्जा प्रकल्प वीज निर्मिती साठी उभारण्यात आला. येथे वीज निर्मितीसाठी जो कोळसा जाळला जातो त्यातून जी कोरडी व ओली राख निघते त्यातली ओली राख वापरली जाते ती वीट भट्टीत विटा बनवण्यासाठी तर कोरडी राख ही कॉस्मेटिक बणवण्यासाठी वापरळी जाते. शेकडो हायवांच्या माध्यमातून सरकारी मालमत्ता असणारी ही राख ताबोडतोब उचलून वीट भट्यापर्यन्त पोहचवण्यात येते,खरे बघितले तर अनेक वर्ष ही राख येथे अशीच पडून असायची, अनेकांनी निरुपयोगी माल म्हणून सोडून दिलेली ही राख उचलली ती बीडच्या पुष्पाने, या रखेवर पहिली नजर जर कोणाची पडली असेल तर ती वाल्मीक कराड याची आणि येथूनच सुरू झाला तो राखेचा बंदुकी खेळखंडोबा, आणि उदयास आला बीडचा पुष्पा ,म्हणजेच वाल्मीक करड.
बीडच्या राखेची नेमकी किंमत किती ?
एक ट्रक राखेची किंमत सुमारे ८ हजार इतकी आहे ,कमीत कमी ६ ब्रास राख यात मावते आणि नंतर यातून ६ ब्रासच्या वीटा तयार होतात सरासरी यातून २ लाखापर्यंत कमाई होते व ही झाली एक ट्रक व एक वीट भट्टीची आकडेवारी आशा सुमारे १२०० हून अधिक वीट भट्टया या सर्व परिसारत असल्याची प्राथमिक माहिती असून दररोज शेकडो हायवा मधून या राखेची ने आण होते ना कोणती टेंडर, ना कोणता लिलाव थेट बंदुकीचा धसका.
एकूणच वजनाने जरी राख हलकी असली तरी याच राखेचे मजबूत आणि जड अर्धकारण जमवले ते बीडच्या पुष्पानेच .
भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.
