Jalna gajanan taur :- गजानन तौर शरीर मरता हैं नाम नहीं …

आज ११ डिसेंबर गजानन मच्छिंद्र तौर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जाणून घेऊ त्यांचा प्रवास.

Published by news24tas

Jalna:- एखाद्या साऊथ च्या हिरोला देखील लाजवेल असा त्याचा ताफा दोस्तीचा दून्येतला राजा माणूस म्हणजेच गजानन मच्छिंद्र तौर ऊर्फ गजूभाऊ तौर.गजानन तौर हा युवक तसा सामान्य कुटुंबातील एक तौर मूळचा घनसावंगी तालुक्यातील शिवण गावचा रहिवासी. त्यांचे वडील मच्छिंद्र तौर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी पण त्यांचे पाऊल गुन्हेगारी कडे वळले आणि सुरू झाला गाजनान तौर ते गजूभाऊ तौर किंग ऑफ जालना इथपर्यंतचा प्रवास.

गजानन

२०११ मध्ये गजानन तौर यांच्या नावावर ३ गुन्हे दाखल झाले कलम ३७९ अंतर्गत चोरीचे आणि त्यानंतर गजानन तौर यांचे नाव वेगवेगळ्या गुन्ह्यात चर्चेत येऊ लागले. खून,खुनाचा प्रयत्न अपहरण धमकी गोळीबार करून दहशत पसरवणे अशा कित्येक प्रकरणात गुन्हे दाखल झाले व पुढे जाऊन यातल्या अनेक गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका ही झाली तर काही केसेस अजूनही चालू होत्या.

पण गजानन तौर यांचे नाव चर्चेत आले ते एका गोळीबार व जालन्यात झालेल्या एका अपहरणामुळे पुढे या केसमध्ये त्यांना शिक्षाही झाली अनेक वेळा जेलमध्येही जावं लागलं पण जेलमधुन बाहेर येत मागील ५-६ वर्षांपूर्वी गजानन तौर यांनी गुन्हेगारी क्षेत्रातून बाजूला जात राजकीय व सामाजिक कामे हातात घेतली. लोकांना मदत करणे,कोणत्याही मित्रासाठी अर्ध्यारात्री मदतीला धाऊन जाणे, कोणाला पैशांची गरज असेल त्याला मदत करणे,अनेकांना रोजगार व्यवसाय उपलब्ध करून देणे ‘दोस्तोका दोस्त दुष्मनो का दुश्मन’ अशी गजानन यांची ओळख संपूर्ण जालना शहरात व जिल्ह्यात होऊ लागली होती.

गजानन तौर यांची राजकीय सुरवात.

टोपे गजानन

तौर यांची राजकीय सुरवात खऱ्या अर्थाने त्यांच्या मूळ गाव असलेल्या घनसावंगी मतदार संघातून झाली.राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ गजानन यांनी अनेक ठिकाणी रॅली, प्रचार सभा व प्रचारासाठी आपले कार्यकर्ते व मित्रपरिवार उभा केला होता. याचा मोठा फायदा देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांना झाला होता. त्यानंतर काही कारणामुळे टोपे आणि तौर यांच्यात बिनसले व तौर टोपे यांच्या पासून वेगळे झाले असे बोलले जाते.

गजानन

नंतरच्या काळात गजानन तौर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतले. अर्जुन खोतकर यांचे ते खंदे समर्थक म्हणून जालन्यात ओळखले जाऊ लागले.अनेक सामाजिक कामे त्यांनी यानंतर सुरू करत तरुणांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. जालन्यातील सर्वात मोठी रामनवमी तसेच आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आंदोलनात देखील त्यांचा मोठा सक्रिय सहभाग होता. त्यावेळी मोर्च्यात सक्रिय सहभाग घेत त्यांनी मोर्चात आर्थिक मदत करत अनेक ठिकाणी जेवण,पाणी बॉटल व मोर्चात लागणारे साहित्य देखील त्यांनी वाटप केले होते एकूणच गजानन तौर यांनी अल्पावधीतच गुन्हेगार ते एक तरुण समाज सेवक व हिंदू नेतृत्व अशी आपली ओळख जालना शहरात निर्माण केली होती आज देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे चाहते कार्यकर्ते व मित्रपरिवार काम करत आहे गजानन तौर यांच्या नावाने स्वर्गीय गजानन तौर फाऊंडेशन ८८८ सुरू करत अनेक तरुणांना रोजगार, रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे, गो शाळेत चारा वाटप असे सामाजिक कार्यक्रम मागील वर्षभरापासून फाऊंडेशन मार्फत केले जातं आहे आजही त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जालना शहरात अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

११ डिसेंबर तौर यांच्या समर्थकांसाठी काळा दिवस.

मागील वर्षी ११ डिसेंबरला २०२३ ला गजानन तौर यांच्यावर ते रामनगर साखर कारखाना येथून त्यांच्या ८८८ नंबरच्या ब्लॅक स्कॉर्पिओ ने येत असताना त्यांच्यावर मंठा चौफुली जालना येथे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर  उपचारा आधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले होते.

एकंदरीतच गजानन तौर यांची सुरवात जरी गुन्हेगारी क्षेत्रातून झाली असली तरी त्यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले तरुणांना सामाजिक कामे हाती घ्यायला लावली. एकूणच तुमची सुरवात कशीही असो तुम्ही या समाजासाठी काय करता यावरच तुम्हाला लोक लक्षात ठेवतात. म्हणूनच आजही जालन्यात त्यांच्या नावापुढे एक ओळ नक्की वापरली जाते #शरीर मरता हैं नाम नहीं.

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या