चिमुकलीवरील अत्याचारामुळे जालना शहर हादरले.
जालना:- जालना शहरात माणुसकीला काळींबा फासणारी घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण जालना शहरात संतापाची लाट उसळली आहे व या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जालना शहरातील जुना जालना भागात एक किरायच्या वाड्यात एक पती पासून विभक्त असलेली महिला तिच्या ४ वर्षीय व ६ वर्षीय अशा दोन मुलींसह तिच्या प्रियकरासोबत राहत होती. मात्र तिच्याच प्रियकराने त्या महिलेच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.सदरील आरोपीला पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अटक केली असून आरोपी प्रशांत वाडेकर यांच्यावर लैंगिक अत्याचार व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही मुलींवर अत्याचार झाल्याची घटना जालन्यात उघडकीस.
गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचदिवशी रात्री प्रशांत वाडेकर यास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, किशोर वनवे यांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. अटकेत असलेल्या प्रशांत वाडेकर याची न्यायालयाने १० एप्रिल पर्यंतच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, कोठडीतील चौकशीदरम्यान नराधम प्रशांत वाडेकर याने प्रेयसी घरी नसतांना पीडित ६ वर्षीय मुलीवर व ४ वर्षीय लहान मुलीवर देखील लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक कबुली दिली. त्यामुळे पुन्हा पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून प्रशांत प्रकाश वाडेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ६४ (२) (एफ), ६५ (२) आणि पोक्सो कायद्याच्या ४, ६, ८ कलमान्वये कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंक मोबाईल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे हे पुढील तपास करीत आहेत.
बदलापूर एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश.
नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी घेतल्या नदी पात्रात उड्या!
