परभणी येथे ॲड. सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ २१ डिसेंबर २०२४ रोजी जालना बंद ची हाक.
News published by news24tas
जालना:- परभणी येथे ॲड. सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ २१ डिसेंबर २०२४ रोजी जालना बंद ची हाक देण्यात आली असुन असे निवेदन देखील जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना देण्यात आले आहे.
या बंदाची हाक सर्व सामाजिक संघटना, आंबेडकरी समाज तसेच वडार समाज यांनी दिली असून २१ तारखेला कडकडीत बंद करून परभणी येथे झालेल्या संविधान पुस्तकाची तोडफोड व सोमनाथ सुर्यवंशी हत्यकांडच्या निषेधार्थ व न्याय मिळण्यासाठी सदरील बंद पुकारण्यात आला आहे.
यावेळी २१ तारखेला सर्वांनी मामा चौक जालना येथे एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच विविध राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा
जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील या बंदला पाठिंबा दिल्याचे समजत असून या बंद मध्ये अर्जुन खोतकर उपस्थित राहतात का हे बघावे लागेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील या बंदला पाठिंबा दिल्याची माहिती असून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या बंदात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जालना:- कोटींची कर वसुली पण ट्राफिक नियोजन नाही वाचा संपुर्ण बातमी.
