लवकरच जालना शहरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारू – आ.अर्जुन खोतकर.

भगवान परशुराम जयंती निमित्त शुभेच्छा देत आ.अर्जुन खोतकर यांचे आश्वासन.

News published by News24tas

जालना:– दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील भगवान परशुराम जयंती जालना शहरात मोठ्या उत्साहाने व आनंदमय वातावरणात साजरी झाली असून अनेक परशुराम भक्तांनी यावेळी निघालेल्या शोभा यात्रेत सहभाग घेऊन जयंती उत्साहात साजरी केली.सदरील शोभायात्रेत जालना विधानसभेचे आमदार अर्जुन खोतकर हे देखील सहभागी झाले होते व यावेळी बोलताना उपस्थितांना खोतकर यांनी भगवान परशुराम यांच्या पुतळ्या संदर्भात शब्द दिला व लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले.

गांधी चमन परिसरात भगवान परशुराम यांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार – आ.अर्जुन खोतकर.

जालन्यात भगवान परशुराम जयंती निमित्त शोभा यात्रेच्या आयोजन करण्यात आले होते.यावेळी भगवान परशुराम यांचा पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पहिली मागणी मी केली होती.याची आठवण देखील आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थितांना करून देत भगवान परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अर्जुन खोतकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, मनोज महाराज, किशोर कुमार तिवारी ,माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सध्या देठे, विनायक महाराज फुलंब्रीकर यासह ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

थेट शिवसेना भवनाच्या गेटवर झळकला राज ठाकरेंचा फोटो.

धमकी प्रकरणी अल्पवयीन मुलानंतर आणखी दोघे अटकेत.

वारंवार निवेदन देऊन व आंदोलने करून देखील मागण्या पूर्ण होईनात!

JALNA/जालन्यात पाण्याचा प्रश्न नेमका सोडवला कोणी ?

नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या