जालना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात कर वसुली केली जाते मग कर जातो तरी कुठे – राहुल रत्नपारखे (मनसे शहरअध्यक्ष).
News published by news24tas
जालना:- जालना शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगर पालिकेकडून कर वसुली केली जात आहे तर वसूल केलेले पैसे जातात तरी कुठे असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी उपस्थित केला.
यावेळी ते बोलताना म्हणले की कर वसुली मोठ्या प्रमाणत जालना शहरात चालू आहे पण इतकी मोठी कर वसुली करून देखील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.नागरिकांना आयुक्त साहेब म्हणाले होते की ४ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल परंतु अजून देखील जालना शहरात नगर पालिकेची महानगर पालिका झाली तरी देखील नागरिकांना १० ते १२ दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे अनेक ठिकाणी नव्याने बांधण्यात आल्याले स्वच्छतागृह अस्वच्छ अवस्थेत आहेत,त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यात खंबे की खंब्याच्या मध्ये रस्ते आहेत हेच कळत नाही.
वारंवार निवेदन देऊन देखील जर यावर उपाय योजना होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागरिक एकत्रित येत महानगर पालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे रत्नपारखे म्हणले.
जालन्यात वाहतूकोंडीमुळे नागरिक हैराण वाचा सविस्तर बातमी.
